पुणे – कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. आता कसलीही काळजी नाही, असा विचार करीत असाल, तर तसे करू नका. पुणे जिल्ह्यात दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के इतके आहे. या उलट एक डोस झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण हे यापेक्षा कमी आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करा, तरच तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या संपर्कात येणाऱ्यांना सुरक्षित ठेवू शकाल.

पुण्याने कोरोनाची पहिली आणि दुसऱ्या लाटेचा भयंकर अनुभव घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. ती टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आपल्यापुढे आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी झाल्याने सर्व जनजीवन पूर्ववत होत आहे. त्याच दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. त्यात शाळा आणि महाविद्यालया देखील सुरू होत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपयोजनांचा आग्रह धरला जात आहे.

हेही वाचा: चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका आता ‘बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर’शी

तर लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. याला लोकांकडून प्रतिसाद मिळत असून लसीकरणाची संख्या गेल्या दोन महिन्यांत वेगाने वाढली आहे. परंतु लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतर नागरीकांनामध्ये बेफिकिरी वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे हे सहज आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची वाढण्याचा धोका कायम असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास उपचारासाठी रुग्णालयांची संख्या कमी आहे. तसेच त्यांच्यापासून इतरांना धोका मात्र कायम असतो. कारण त्यांच्या माध्यमातून संपर्क येणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ धुण्याच्या त्रिसूत्रीचा गांभीर्याने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here