मुंबई – बॉलीवूडमध्ये ती अभिनेत्री नसती आली तरी फारसं काही बिघडलं नसतं. तिच्याकडे तिच्या आईसारखं रुप नव्हतं, भावासारखं ग्लॅमरही नव्हतं. मात्र तरीही तिचा साधेपणा चाहत्यांना भावला. काही अंशी ती बॉलावूडमध्ये यशस्वी झाली देखील. आता आपल्या कुटूंबाला वेळ देण्यास तिनं प्राधान्य दिले आहे. आपण चर्चा करत आहोत ती अभिनेत्री सोहा अली खानची. आज तिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.तुम मिले, रंग दे बसंती, सारख्या चित्रपटांतून तिनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आता ती पूर्णवेळ गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसते. तिनं अभिनेता कुणाल खेमू सोबत लग्न केलं आहे.




सोहाचं शिक्षण हे दिल्लीतल ब्रिटिश स्कूलमध्ये झालं आहे. तर तिनं मॉडर्न हिस्ट्रीचं शिक्षण बल्लोई ऑक्सफर्डमधून घेतलं आहे. याशिवाय तिनं लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधूनही पदवी घेतली आहे.


Esakal