प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकते आहे. गेल्या आठवड्यात तिने टाकलेल्या व्हिडिओची चर्चा वेगळ्याच कारणामुळे रंगली. डान्समध्ये तीने घातलेल्या रिप्ड जीन्समुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.हे अमृताच्या बाबतीत जरी झालं असलं तरी आता या रिप्ड जीन्स फॅशन स्टेटमेंट बनल्या आहेत. सेलिब्रिटींपासून आजच्या तरूणाईला सर्वांनाच ही जीन्स प्रचंड आवडते.

रिप्ड जीन्समुळे अमृता खानविलकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
रिप्ड जीन्स असते कशी?
रिप्ड जीन्स म्हणजेच फाटकी जीन्स. गुडघ्याच्या जागी ती फाटलेली असते. पूर्वी फक्त गुडघ्यापर्यंत फाटलेली वाटेल एवढीच मर्यादा असलेल्या या जीन्समध्ये आता भरपूर कट आले आहेत. त्यात मांड्या, गुडघ्याच्या खालचा भाग, साईट कट असेही प्रकार आहेत. असलेली ही जीन्स अशी फाटलेली जीन्स कशी घालायची असा प्रश्न पडू शकतो. पण हेच आजचे स्टाईल स्टेटमेंट आहे.
ही जीन्स आली कुठून?
अमेरिकेतील उद्योजक लोब स्ट्रोस यांनी 1870 मध्ये जीन्सचा शोध लावला. त्याचा वापर वाढल्यावर 70 च्या दशकात आलेल्या आणि डिस्ट्रेस्ड जीन्सची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिप्ड जीन्सची फॅशन त्या काळच्या लोकांना जरा विचित्रच वाटली. पण नंतर नंतर वेगळी स्टाईल म्हणून लोकांनी ती स्वीकारायला सुरुवात केली. काहींनी तर स्वतःजवळ असलेल्या प्लॅन जीन्स ला गुडघ्याजवळ कट मारून त्याची रीप्ड जीन्स बनवली. कधी काळी हजारो रुपयांना मिळणारी, श्रीमंतापर्यंतच मर्यादित असलेली ही जीन्स आता सर्वसामान्य तरूणाई बिनधास्त वापरू लागली आहे. भारतात सलमान खानने ही जीन्स ओ ओ जाने जाना या गाण्यापासून लोकप्रिय केली. कॉलेजला जाताना, पार्टीसाठी अशाच जीन्स वापरल्या जातात.
हेही वाचा: चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात ‘किसींग’ने का होते?

अशी वापरा जीन्स
डेनिम शर्ट, प्रिंटेड शर्ट वर रिप्ड जीन्सवर वापरता येऊ शकतात. पार्टीसाठी हा लूक चांगला वाटेल. तसेच प्लॅन शर्ट्स, क्रॉप टॉप, डाऊन बटन शर्ट्स, डेनिम शर्ट्सवर रिप्ड जीन्स ट्राय करता येईल. यानुसार किंवा तुम्ही तुमच्या स्टाईल स्टेटमेंटप्रमाणे या जीन्सवर प्रयोग करू शकता.
Esakal