रिमेक बनवणं ही काही वाईट गोष्ट नाही. पण फ्रेम बाय फ्रेम कॉपी पेस्ट बनवणे आणि न्यु मुव्हीच्या नावाखाली प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडचा उद्योग राहिला आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून टॉलीवूडच्या बहुतांशी चित्रपटांची कॉपी पेस्ट बॉलीवूडने केली आहे. त्यात तो थोडा बॉलीवूडचा मसाला टाकला आहे. आणि ती डिश प्रेक्षकांपुढे सादर केली आहे. या लेखाच्या निमित्तानं आपण टॉलीवूडमधील अशा पाच चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत ते बॉलीवूडनं चक्क कॉपी केले. रिमेकच्या नावाखाली बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात पैसेही कमावले. असं असलं तरी टॉलीवूडकरांच्या मनात बॉलीवूडविषयी प्रेम आणि आदराची भावना असल्याचं सांगितलं जातं. बॉलीवूडमध्ये मात्र चित्र उलट असल्याची चर्चा सुरु असते.

कुली नं 1 (cooli no 1) – गोविंदा आणि करिश्माच्या जोडीला कुली नं 1 मध्ये पसंत केले गेले. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला होता. चिना मापिल्लई नावाच्या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. आता सारा अली खान आणि वरुण धवननं देखील त्याच्या रिमेकमध्ये काम केले होते.
फोर्स (force) – निशिकांत कामतनं जॉन अब्राहमला घेऊन फोर्स नावाची अॅक्शन थ्रिलर बनवली होती. तो मुव्ही गौतम मेननच्या काखा काखाचा रिमेक होता. फोर्स बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेस झाला होता. त्यात विद्युत जामवालची इंट्री झाली होती.
शुभ मंगल सावधान (shubh mangal savadhan) – आयुषमान खुराणा हा त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. शुभ मंगल सावधान मधील त्याच्या अभिनयाचे कौतूकही झाले होते. तमिळ चित्रपट कल्याणा सम्याल साधम या नावानं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावरुन शुभ मंगल सावधान नावाचा चित्रपट तयार करण्यात आला होता.
गजनी (gazhani) – वास्तविक गजनी हा जरी एका टॉलीवूडच्या चित्रपटाचा रिमेक असला तरी मुळ चित्रपट ख्रिस्तोफर नोलान मोमेंटो या नावानं आहे. इंग्रजी चित्रपट पाहण्यासारखा आहे. आमीरनं जेव्हा हिंदीमध्ये तो केला तेव्हा त्यात टिपिकल बॉलीवू़ड मसाला भरण्यात आला होता. तमिळमध्ये सुर्या नावाच्या अभिनेत्यानं त्यात प्रमुख भूमिका साकारली होती.
दुर्गामती (durgamati) – 2020 मध्ये अभिनेत्री भूमी पेड़णेकरचा दुर्गमती नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो तेलुगू चित्रपट भागामथीरे चा रिमेक होता. अर्थात भूमीच्या अभिनयाचं कौतूक झालं होतं. मात्र हिंदीतील चित्रपटानं फारसा व्यवसाय केला नाही.
साथिया (sathiyaa) – ए आर रेहमान यांचं संगीत आणि मणिरत्नम यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये मोठं यश मिळवलं. अल्लायपायुथे नावाच्या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. हिंदीमध्ये विवेक ऑबेरॉय़ आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here