IPL 2021 KKR vs DC: दिल्लीचा यंदाच्या ‘प्ले ऑफ्स’साठी पात्र ठरला आहे. त्यांच्यासोबत चेन्नई आणि बंगळुरू या दोन्ही संघांनाही प्ले ऑफ्सचे तिकीट मिळालं आहे. पण, काही दिवसांपूर्वी कोलकाताविरूद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीला खराब फलंदाजीचा फटका बसला. दिल्लीच्या फलंदाजांनी २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या नितीश राणाने शेवटपर्यंत खिंड लढवत नाबाद ३६ धावा केल्या. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्यातील वादाची चांगलीच चर्चा रंगली. त्या वादावर मत व्यक्त करताना, ‘प्रत्येक वादात अश्विनच कसा काय अडकतो?’, असा खोचक सवाल महान फिरकीपटू शेन वॉर्नने केला होता. त्यानंतर आता लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी अश्विनला पाठिंबा दर्शवला असून ऋषभ पंतला फटकारलं.

हेही वाचा: “प्रत्येक वादात अश्विनच का असतो?”; शेन वॉर्नचा तिखट सवाल

“पंतच्या अंगाला लागलेला चेंडू अश्विनला माहिती नव्हता. त्यामुळे अश्विनने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. अश्विनवर साऱ्यांनी टीका केली. पण माझा प्रश्न असा आहे की ऋषभ पंतने धाव घेण्याची तयारी का दर्शवली? पंतला याबद्दल कोणीच प्रश्न का विचारला नाही? क्रिकेटच्या शिष्टाचारांनुसार जर आपल्या शरीराला लागून चेंडू दुसरीकडे गेला असेल तर अतिरिक्त धाव न घेता खिलाडूवृत्ती दाखवायची असते. ही बाब दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला माहिती होती. त्यामुळे त्याने त्याबद्दल भूमिका घ्यायला हवी होती”, असं रोखठोक मत सुनील गावसकर यांनी मांडलं.

अश्विन-आयपीएल-शेन-वॉर्न

अश्विन-आयपीएल-शेन-वॉर्न

“संघाच्या धावा कमी झाल्या होत्या ही गोष्ट दोघांनीही माहिती होती. अशा परिस्थितीत एखादी अतिरिक्त धाव मिळाली तर चांगलंच आहे अशा विचाराने त्यांना धाव घेण्याचा मोह आवरला नसावा. पण याचा दोष अश्विनला का दिला जातोय? चेंडू पंतला लागला होता हेदेखील त्याला माहिती नव्हतं. तो आधी धाव पूर्ण करण्यात गुंतला होता. आणि नंतर त्याने थेट चेंडू फिल्डरपासून लांब असलेला पाहिला. या साऱ्या गोंधळात संघाचा कर्णधार आणि त्यावेळचा फलंदाज म्हणून ऋषभ पंतने मध्ये पडत वाद थांबवायला हवा होता”, अशा शब्दात गावसकरांनी पंतला सुनावलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here