नवरात्रीला अनेकजण उपवास करतात. काही जण फक्त फळ खाऊन तर काही जण निर्जळी. थोडक्यात पोटाला आराम देण्यासाठी केलेला हा उपवास आरोग्यासाठी फायद्याचा असतो. पण उपवास करताना किंवा कुठलाही नेम पाळताना आपल्या शरीराला त्रास होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला उपवासाचे वेगवेगळे प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला यावर्षी वेगळेपणा मिळू शकतो.

हा प्रकार गेल्या 4-5 वर्षापासून खूप लोकप्रिय आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास नाश्ता करायचा. त्यानंतर दुपारी दोन-अडीचच्या दरम्यान जेवायचं. त्यानंतर संध्याकाळी भूक लागलीच तर गरम पाणी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी किंवा दूध प्यावं. पण रात्रीचे जेवण करू नये. असा उपवास करताना आपल्या शरीराला कर्बोदकं, प्रथिनं,फॅट्स कसे मिळतील याची काळजी घ्यावी.

ज्यांना पुर्ण दिवस उपवास करणं झेपत नाही ते दोन वेळा उपासाचं खाऊ शकतात. यावेळी मात्र नाश्ता करू नये.

या उपासात काहीही न खाता फक्त पाणी प्यायले जाते. अगदी त्रास व्हायला लागला तर तरतरी येण्यासाठी तुम्ही पाण्यात सब्जाचं बी घालू शकता.

नुसती फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकता. सफरचंद, केळी, चिकू,पेरू, पपई, कलिंगड अशी विविध फळं खाऊन हा उपवास करता येईल. काही फळं एकत्र करून मिक्स फ्रुट ज्युसही पिता येऊ शकतो.

फक्त दूध पिऊनही काही जण उपवास करतात. यात तुम्हाला अगदी भूक लागली तर साबुदाणा खीरीचेही तुम्ही सेवन करू शकता.
Esakal