कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला पोलिसांनी अटक केली आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. आर्यनसोबत अटकेत असलेली मुनमुन धामेचा एका बिझनेस कुटुंबातून येते. मुनमुन धामेचा ३९ वर्षांची असून ती एक फॅशन मॉडेल आहे. तीन ऑक्टोबरला एनसीबीने मुनमुनला दुपारी दोन वाजता अटक केली. मुनमुन धामेचा मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील तेहसीलची रहिवाशी आहे. सध्या तिच्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये वास्तव्याला नाहीय. मुनमुच्या आईचं मागच्यावर्षी निधन झालं. त्याआधी तिचे वडिल अमित कुमार धामेचा यांचं निधन झालं. मुनमुन धामेचाचा भाऊ प्रिन्स धामेचा दिल्लीमध्ये काम करतो. सागरमधूनच तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मध्य प्रदेशात सागरमध्ये मुनमुनला फार कोणी ओळखत नाही. सहावर्षापूर्वी भावासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी मुनमुन काही काळ भोपाळमध्ये वास्तव्याला होती. इन्स्टाग्रामवर मुनमुनचे ११.४ के फॉलोअर्स आहेत. २२ सप्टेंबरला तिने फोटोसोबत शेवटची पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर तिला कोणीही सेलिब्रिटी फॉलो करत नाहीय. पण ती अक्षय कुमार, विकी कौशल आणि अन्य सेलिब्रिटींना फॉलो करते.