नागपूर : चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत. आहारातल्या बदलांमुळे कमी वयात विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम गरजेचे असते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊ लागली आहेत. मात्र, काही पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शिअम मिळत नाही. चला तर जाणून घेऊ यात अशा पदार्थांविषयी…

शीतपेयांमधल्या कार्बन डाय ऑक्साइड आणि फॉस्फरसमुळे हाडे ठिसूळ होतात.
चॉकलेटमधल्या काही घटकांमुळेही शरीरातल्या कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.
मिठातल्या सोडिअममुळे शरीरातले कॅल्शिअम मूत्रावाटे बाहेर निघून जाते. म्हणूनच मिठाचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
चहा-कॉफीचे अतिसेवनही शरीरासाठी घातक आहे. यातल्या कॅफेनमुळे शरीरातले कॅल्शिअम नष्ट होऊ लागते.
जास्तीचा मांसाहारही घातक ठरू शकतो. प्राणिजन्य प्रथिने हाडांचे नुकसान करू शकतात. त्यामुळे मांसाहारही प्रमाणात करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here