भारताच्या हवाई दलाने पहिल्यांदाच राफेल फायटर जेटचे स्कॅल्प क्रुझ मिसाईलचे फोटो शेअर केले आहेत. राफेल जेट दोन स्काल्प मिसाईल कॅरी करु शकतं. या मिसाईलची ५०० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. युरोपियन कंपनी एमबीडीएने तयार केलेले स्कॅल्प क्षेपणास्त्र, शत्रूच्या प्रदेशात दुरपर्यंत मारा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. स्कॅल्प हे एक स्टील्थ क्षेपणास्त्र असून रडार डिटेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि अत्यंत कमी उंचीवर उडण्यासाठी डिझाइन केलेले आहे.स्कॅल्प क्षेपणास्त्रे यूकेच्या रॉयल एअर फोर्स आणि फ्रेंच हवाई दलाचा भाग आहेत आणि ती आखाती युद्धात वापरली गेली.
भारताकडे आधीपासूनच हवाई प्रक्षेपण केलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे आणि स्कॅल्पमुळे IAF च्या हवाई संरक्षण क्षमतेला चालना मिळणार आहे. 2016 मध्ये भारताने फ्रान्ससोबत 59,000 कोटी रुपये खर्चून 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी करार केला होता. भारताला आत्तापर्यंत 36 राफेल विमाने मिळालेली आहेत. ही विमानं 36 दसॉल्ट एव्हिएशन कडून ऑर्डर केली आहे.