कोलकाता संघाचा सध्या IPL 2021 मधील प्रवास चढउतारांचा आहे. कोलकाताच्या संघाने पहिल्या टप्प्यात फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पण दुसऱ्या टप्प्यात ते दुबईमध्ये आले आणि त्यांना सूर गवसला. तगड्या संघांना टक्कर देत त्यांनी अनेक संघांना पछाडलं. सध्या त्यांच्या प्ले ऑफ्सच्या समावेशाबाबत अनिश्चितता आहे. पण असे असले तरी कोलकाता संघाला मिळालेला हुकूमी एक्का हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर १२ ते १४ कोटींची बोली लावली जाऊ शकते, असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: “आता बास झालं” म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

व्यंकटेश अय्यर
हेही वाचा: IPL 2021: मुंबई इंडियन्सला ‘या’ संघापासून आहे सर्वाधिक धोका!
कोलकाताचा व्यंकटेश अय्यर हा खूप उच्च प्रतीचा खेळ करणारा फलंदाज आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या IPLच्या मेगा ऑक्शनमध्ये म्हणजेच महालिलावात व्यंकटेश अय्यरवर तब्बल १२ ते १४ कोटींची बोली लागेल. त्याची प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरी अप्रतिम आहे. तो ४७च्या सरासरीने धावा करतो. त्याचा स्ट्राईक रेट देखील ९२ ते ९८ च्या मध्ये असतो. हे त्याचे देशांतर्गत स्पर्धांचे आकडे आहेत. यात IPLचा समावेश नाही. IPLमध्ये तर त्याचा स्ट्राईट रेट वाढलेला दिसतो. तो ३८च्या सरासरीनेही धावा करतो. त्यामुळे हा एक असा खेळाडू आहे ज्याला कशी फलंदाजी करावी हे नीट माहिती आहे. त्यांने कोलकाताकडून खेळताना आपलं मूल्य दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याच्यावर पुढच्या वर्षी महालिलावात कोट्यवधींची बोली लागेल यात शंका नाही”, असं मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा: IPL बेटींगसाठी लाच मागणाऱ्या PSIला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
“मी हल्ली त्याच्या फलंदाजीच्या शैलीवर लक्ष केंद्रित केलं आहे. एक विशेष बाब म्हणजे हा खेळाडू जास्त धावा बॅकफूटवर करतो. पुल शॉट आणि लेट कट हे फटके त्याला विशेष पसंत आहेत. व्यंकटेश अय्यर हा असा खेळाडू आहे जो क्रीज सोडून पुढे येण्याच्या फंदात पडणार नाही. बॅकफूट उभा राहून त्याच्या पसंतीचे फटके नीट खेळेल. त्याच्याकडे एक पाय क्रीजच्या आत ठेवून दुसरा पाय पुढे काढून खेळण्याची कला आहे. त्याच्याकडे पाहिलं की मला तो टी२० सामन्यातील गेमचेंजर वाटतो”, अशा शब्दात त्यांनी व्यंकटेश अय्यरची स्तुती केली.
Esakal