चंदेरी दुनियेतील अनेक कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आजवर वेगवेळ्या प्रकरणांमध्ये विशेषत: अमली पदार्थ सेवन प्रकरणात आढळून आले आहेत. सध्या प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आढळला आहे. कोर्डेलिया या अलिशान क्रुझवर शनिवारची रात्र पार्टीने रंगली होती. या पार्टीदरम्यान, एनसीबीने छापा टाकला आणि पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं. याच पार्टीत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हा सुद्धा सहभागी होता. आर्यन खानचं हे प्रकरण सध्या कोर्टात आहे, मात्र दुसरीकडे त्याची प्रसिद्धि देखील वाढताना दिसते आहे.

03 ऑक्टोबरला असलेल्या फॉलोअर्सची संख्या

03 ऑक्टोबरला असलेल्या फॉलोअर्सची संख्या

बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. तर अनेकजण शाहरुख आणि त्याच्या मुलावर जोरदार टीका करताना दिसता आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आर्यन खानची प्रसिद्धि वाढत असल्याचे दिसते आहे. गेल्या काही दिवसांत आर्यन खानचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. ऑक्टोबरच्या सुरूवातील १.४ दशलक्ष पर्यंत असलेल्या आर्यन खानच्या फॉलोअर्सची संख्या ४ ऑक्टोवर रोजी १.५ दशलक्ष एवढी झाली. त्यामुळे एकीकडे टीकेचा धनी ठरत असलेला आर्यन खानला दुसरीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धि मिळतेय.

हेही वाचा: ड्रग्जविषयी आर्यन कोडवर्डमधून बोलायचा, काय होता कोर्टातील युक्तिवाद

04 ऑक्टोबरला फॉलोअर्सची संख्या वाढली

04 ऑक्टोबरला फॉलोअर्सची संख्या वाढली

दरम्यान, आज एनसीबीकडून आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीने आर्यन खानच्या एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुमुन धामेचा तीन आरोपींना न्यायालयाकडून ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी (NCB Custody) देण्यात आली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here