येत्या दोन-तीन तासांत पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत. या मुसळधार पावसात झाडे कोसळण्याची, जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.

अत्यंत महत्त्वाचे ! पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा. – पुणे महापौर मुरलीधर मोहोळ

  • वाघोलीत दीड तासापासून जोरदार पाऊस.

  • सखल भागात पाणी साचले

  • पुणे नगर महामार्गावरील वाहतूक मंदावली. यामुळे काही प्रमाणात कोंडी

  • अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांचे हाल.

  • अद्यापही जोरदार पाऊस सुरू

  • पाऊस सुरू झाल्यापासून वीज पुरवठा गुल.

  • विश्रांतवाडी परिसरात सातनंतर मुसळधार पाऊस पडत आहे. फुलेनगर, अग्रसेन शाळेजवळ तसेच विमानतळ रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. टिंगरेनगरमध्ये पहाटेपासून वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

  • औंध व परिसरात जोरदार पाऊस

  • तासभरापासून औंध,बोपोडी, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण,सुतारवाडी,महाळुंगे,सूस परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

  • खडकी, वाकडेवाडी परिसरात ढगाच्या गडगडाटासह विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु, लाईट गेल्याने सर्वत्र अंधार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here