नाशिक : कोरोना (Corona) निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन (Brake the chain) अंतर्गत राज्य शासनाने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे दरम्यान हीच नियमावली नाशिक शहर आणि राज्यातही कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र, दुर्गापुजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

हेही वाचा: Navratra 2021 नवरात्रीत उपवास करताय? हे Healthy Fasting चे प्रकार ट्राय करा!

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलेल्या सुचना पुढीलप्रमाणे –

देवीच्या मुर्तीची उंची ४ फूटच असावी

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मुर्ती शाडूची- पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

गरबा, दांडिया नाहीच

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

दर्शनाची सुविधा ऑनलाईन

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी जेणेरून धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही.

हेही वाचा: यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे : पंचांगकर्ते मोहन दाते

मंडपात पाच जणांनाच परवानगी

मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

कृत्रीम तलावांची निर्मिती

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांना बोलावू नये. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here