पुणे : पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनलॉकनंतर सातत्याने वाढत असल्याने परवडणारा पर्याय म्हणून अनेक वाहनचालकांनी सीएनजी वापरण्यास सुरुवात केली. मात्र आता सीएनजी देखील साठीच्या घरात पोचले आहे. त्यामुळे परवडणारा पर्यायदेखील वाहनचालकांचा खिसा रिकामा करतोय.
रविवारी रात्रीपासून पुण्यात सीएनजी प्रतिकिलो दोन रुपयांनी महागला. त्यामुळे त्याची किंमत ५९.५० रुपये प्रति किलो झाली आहे. जुलै २०२० पासून सीएनजी ४.७० रुपयांनी महागले आहे, तर सप्टेंबर महिन्यात स्थिर व काहीसे कमी होत असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढू लागले आहेत. गेल्या महिन्यात डिझेल चार वेळा तर पेट्रोल तीन वेळा महागले. सीएनजी मात्र स्थिर होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दर कमी होते अशी आस वाहनचालकांना होती. मात्र त्यावर गेल्या चार दिवसांत पाणी फिरले आहे.
सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यापूर्वी दरवाढ होताना ती ५० पैसे ते एक रुपयाच्या दरम्यान झाली. अचानक दोन रुपयांनी किंमत का वाढली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
– अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
वाढलेले इंधनाचे दर परवडत नाहीत म्हणून मी तीन महिन्यांपूर्वी माझ्या कारला सीएनजी बसवले. पेट्रोलच्या वाढत्या किमतीपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून मी सीएनजीचा वापर सुरू केला. मात्र, आता सीएनजीदेखील महाग झाल्याने नेमके करायचे काय, असा प्रश्न पडला आहे.
– अभिजित घाटे, नोकरदार पहिल्यांदाच दोन रुपयांनी दरवाढ
जानेवारी महिन्यात सीएनजी १.६५ रुपयांनी महागले होते. त्यानंतर सोमवारी (ता. ४) पहिल्यांदाच सीएनजीचे दर प्रतिकिलो थेट दोन रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे अशीच दरवाढ होत राहिली तर सीएनजीचे दर देखील पेट्रोल-डिझेलएवढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या चार दिवसांत झालेली दरवाढ
गेल्या चार दिवसांत झालेली दरवाढ
Esakal