जगभरात सात तासांहून अधिक काळ फेसबुकच्या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा बंद झाली होती. सात तासानंतर फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉटसअॅप सुरु झाले आहेत. दरम्यान, व्हॉटसअॅप, फेसबुक वापरण्यास अडचणी आल्यानंतर सुरुवातीला इंटरनेट प्रॉब्लेम किंवा मोबाइलचा इश्यू असल्याची शंका युजर्सना आली. मात्र जेव्हा कंपनीकडून ट्विटरवरून याबाबत सांगण्यात आल्यानंतर सिस्टिम डाऊन झाल्याचं समजलं. त्यानंतर ट्विटरवर फेसबुकला ट्रोल करण्यात आलं. तसंच ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे कौतुक करण्यात आले.

अनेक दिग्गज कंपन्यांनी फेसबुक डाऊनच्या प्रकारावर मजेशीर ट्विट केली आहेत. तसंच व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकने ट्विटरवर त्यांच्या युजर्ससाठी टाकलेल्या ट्विटवर भन्नाट अशी उत्तरंसुद्धा दिली आहेत. यातच एका ट्विटर युजरचे ट्विट जोरदार चर्चेत आहे.

हेही वाचा: WhatsApp, Facebook, Instagram का झालं होतं ठप्प?

फेसबुक डाऊन झाल्यानंतर एका युजरने टेलिग्रामचे आभार मानले आहेत. यावर टेलिग्रामने रिप्लायसुद्धा दिला आहे. युजरने आभार मानताना म्हटलं की, तु माझं नातं वाचवलंस त्याबद्दल आभार. विशेष म्हणजे योगेशच्या या ट्विटला टेलिग्रामनेसुद्धा विनोदी शैलीत उत्तर देताना एक प्रश्न विचारला. टेलिग्रामने म्हटलं की, मग मला लग्नाला आमंत्रण मिळणार ना?

सोशल मीडियावर आता फेसबुक डाऊनवर मोठ्या प्रमाणावर मीम्स व्हायरल होत आहेत. यात सर्वाधिक मीम्समध्ये फेसबुक किंवा इतर अॅप्स डाऊन झाल्यानंतर सर्वात आधी ट्विटरवरच धाव घेतली जाते हे सांगणाऱ्या मीम्सचा समावेश आहे. फेसबुकसह तिन्ही अॅप्स डाऊन झाल्याचा परिणाम ट्विटरवरसुद्धा झाला. काही काळ ट्विटर वापरण्यामध्येही युजर्सना अडचणी येत होत्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here