नखांवर नुसते नेलपेंट लावून मिरविण्याचा ट्रेंड आता काहीसा जुना झाला आहे. त्यापेक्षा काहीतरी हटके करण्याकडे मुलींचा ओढा वाढतो आहे. यात सध्या विविध प्रकार खूप लोकप्रिय झाले आहेत. थ्रीडी नेल आर्ट पासून अगदी नेल ज्वेलरीपर्यत यात प्रकार पाहायला मिळत आहेत. मुली कपड्यांच्या बाबतीत जश्या चुझी आहेत तश्याच नेल आर्टच्या बाबतीतही झाल्या आहेत. काय आहे हा नेल फॅशनचा ट्रेंड जाणून घेऊया.

नेल ज्वेलरीत सध्या वेगवेगळ्या दागिन्यांच्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत.
नखे दागिने
नेल ज्वेलरीमध्ये नेल आर्टची डिझाईन असतेच. पण त्याचबरोबरीने दागिन्यांचे छोटे तुकडे असतात. त्यावर मेटल वायर, रिंगही बसवली जाते. बेस चांगला दिसण्यासाठी ग्रीन नेल आर्ट, ओब्रे नेल आर्ट थ्रीडी नेल आर्ट अशा काही डिझाईन्सचा वापर केला जात आहे. यात साखळ्यांपासून फुले, प्राणी,, होलोग्राफिक डिझाईन्स केले जातात.

पाण्याचे थेंब नेल आर्ट
पाण्याचे थेंब तुमच्या कलरफुल नखांवर अवतरले तर. हाच इफेक्ट यामधून देता येतो. पाण्यासारखे दिसणारे मणी हे जेल किंवा डार्क नेलपोलिशच्या ग्लोबपासून बनविल्या जातात. यामुळे आपल्या नखांना थ्रीडी पोत मिळतो. परदेशात हा लूक सध्या खूप लोकप्रिय आहे.
हेही वाचा: तुमचे Sleep Routine खराब झालंय? ‘या’ गोष्टी माहित असणे गरजेचे!

कवई नेल आर्ट
ही कला जपानी सौंदर्यशास्त्रावर आधारित आहे, नखांवर एक्रेलिक कलरच्या मदतीने थ्रीडी इफेक्ट देऊन किटी,इंद्रधनुष्य, टेडीबियर असे प्रकार काढता येऊ शकतात. दिसायला एकदम कलरफूल असणारा हा प्रकार लक्ष वेधून घेतो.

थर्मल नेल आर्ट
या प्रकारात जेल पॉलिश मध्ये बहुरंगी मॅनिक्युअरचा समावेश करता येतो. एकदा आवडत्या रंगाचा लेयर लावल्यानंतर हवे ते डिझाईन त्यावर काढता येते. ही थर्मल इफेक्ट देणारी लेयरिंग दिसायलाही आकर्षक दिसते.

कँडी नेल आर्ट
निऑन कलर्सचा वापर होणाऱया या प्रकारात हब्बा हुब्बा गम, रिंग पॉप्स हे नखांवर थ्रीडी प्रकारात काढता येतात. रंग वेगळे असल्याने दिसायला एकदम मनमोहक वाटतात.
Esakal