कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि कोरोना विषाणू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान, जर तुम्ही फिरायला जात असाल तर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर आपण निष्काळजी राहिलं तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर प्रवास करताना या टिप्स नक्की फॉलो करा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. मानसिक आरोग्यासाठी योगा आणि ध्यान करा. जर तुम्ही दिवसाची सुरुवात योग आणि व्यायामासह केली तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. विशेषतः प्रवासादरम्यान, मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी ध्यान करा.
अनेक लोक सकाळी ऑफिसला जाण्यास गडबड होत असल्यामुळे नाश्ता करत नाहीत. यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत. नाश्ता न केल्यामुळे जेवण जास्त पोट भरुन केले जाते. याव्यतिरिक्त, जेवण केल नाही तर चिडचिडेपणा, सुस्त आणि झोपावेसे वाटू लागते. यासाठी दररोज नाश्ता करा. आपल्या नाश्त्यामध्ये फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा.
डॉक्टर नेहमी जास्त पाणी पिण्यास सांगतात. यासाठी दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्या. यामुळे वजन नियंत्रित राहते. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि सतत खाण्याच्या सवयीपासून सुटका मिळते. दररोज जेवणापूर्वी 30 मिनिटे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर पडते.
तज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. यासाठी थोड्या थोड्यावेळेत अन्न खा. हे मेटाबॉलिजम रेट सुधारते. जर एखाद्याने एकाच वेळी भरपूर अन्न खाल्ले आणि नंतर भुकेले राहिले तर ते हळूहळू कॅलरीज बर्न करते आणि चरबी जमा करण्यास सुरवात करते. यासाठी, नियमित अंतराने जेवण करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here