टेलिव्हिजनची सर्वांत लोकप्रिय जोडी डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. २०११ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. आता १० वर्षांनंतर बंगाली पद्धतींनुसार डेबिना-गुरमीतने पुन्हा लग्नगाठ बांधली.

या फोटोंमध्ये डेबिना लाल साडीत तर गुरमीत धोती-कुर्ता या पोशाखात दिसत आहे.
बंगाली परंपरेनुसार लग्न करण्याचं डेबिनाचं स्वप्न होतं. गुरमीतने ते पूर्ण केलं.
या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
२००८-२००९ दरम्यान डेबिना आणि गुरमीतने ‘रामायण’ या मालिकेत सीता आणि रामची भूमिका साकारली होती.
डेबिनाने ‘यम हैं हम’, ‘डॉ मधुमती ऑन ड्यूटी’ आणि ‘संतोषी माँ’सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. गुरमीतने ‘गीत – हुई सबसे पराई’ आणि ‘पुनर्विवाह- जिंदगी मिलेगी दोबारा’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here