sunset and sunrise : सुर्योदय आणि सुर्यास्त पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला सुर्योदय किंवा सुर्यास्त पाहायला आवडतं नसेल. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे आरोग्यासाठी लाभदायी होतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत, मित्रमैत्रिणींसोबत अशा ठिकाणांसोबत जात असाल तर तुम्हाला सुंदर सुर्योदय आणि सुर्यास्त पाहायला मिळेल अशी काही ठिकाणं सांगणार आहोत.

तुम्ही जर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जात असाल तर गोवा हे उत्तम ठिकाणं आहे. जर काही वेळ तुम्हाला शांत आणि निवांत घालवायचे असेल तर गोवातील बीचवर सुर्यास्त आणि किल्ल्यांवर जाऊन सुर्योदयाच आनंद लुटू शकता.

रोजच्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला थोडी शांती हवी असेल तर तुम्ही ओडिसाला फिरायला जाऊ शकता. येथील समुद्र किनारे सुंदर आहे. आणि ओडीसामधील चिल्का झील खूप प्रसिध्द आहे जिथे दर रोज लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. येथून तुम्हाला सुर्योदय आणि सुर्यास्त पाहाता येईल.

लक्षद्वीप हे असे ठिकाणं आहे जिथे तुम्ही वर्षातून केव्हाही जाऊ शकता कारण हे वातावरण नेहमीच सुंदर असते. येथील समुद्र किनारी खूप स्वच्छ असतात, येथून सुर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळा आहे.

केरळला देवांची भूमी मानले जाते. येथील सुंदर समुद्र किनाऱ्यांपासून ते बॅकवॉटरपर्यंत सर्वकाही मंत्रमुग्ध करणारे आहे. एलेप्पी केरळमध्ये सर्वात प्रसिध्द जागांपैकी एक आहे जी पूर्व व्हेनिसच्या म्हणून प्रसिध्द आहे. त्याशिवाल तुम्हाला नेल्लियमपतिच्या डोंगरावरुन तुम्ही सुर्योदय आणि सुर्यास्त पाहू शकता.
Esakal