मुंबई – बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनला ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. सध्या 7 ऑक्टोबर पर्यत कस्टडीमध्ये आहे. यासगळ्यात बॉलीवूड विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी शाहरुखला सपोर्ट केला आहे. त्याच्या बाजूनं उभं राहायला सुरुवात केली आहे. ज्यावेळी आर्यनला अटक झाली त्यानंतर तातडीनं बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं त्याची भेट घेतल्याचे दिसून आले. तसेच अभिनेत्री पूजा भट्ट, प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील आर्यनच्या बाजूनं बोलायला सुरुवात केली आहे. आता प्रसिद्ध गायक मिका सिंगनं देखील किंग खानला सपोर्ट करत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. दोन दिवसांपासून शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
बॉलीवूडचा स्टार अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन खाननं देखील शाहरुखला सपोर्ट केला आहे. आर्यनच्या प्रती काळजी व्यक्त केली आहे. आर्यनला शनिवारी एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला रविवारी अटक करण्यात आली. काल त्याला एनसीबीच्या कोर्टातही हजर करण्यात आले होते. त्याला 7 ऑक्टोबर पर्यत कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. बॉलीवूडच्या स्टारनं शाहरुखला सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. ऋतिक आणि त्याच्या पत्नीचं म्हणणं आहे की, आर्यनचे दुर्देव असे की, तो चूकीच्या ठिकाणी चूकीच्या वेळी होता. मला वाटतं आर्यन हा एक चांगला मुलगा आहे. तो वाईट नाही. असं सुझैननं म्हटलं आहे. काही कारणास्तव त्याला टार्गेट केलं जात आहे. लोकांना त्याच्याविषयी बोलायला काय जातंय, सत्य काय आहे हे कोणाला माहिती नाही. कारण लोकं नेहमीच बॉलीवूडच्या लोकांना नावं ठेवताना दिसतात.

प्रख्यात गायक मिका सिंगनं देखील व्टि केलं आहे त्यात तो म्हणतो, मी जेव्हा ती कॉर्डेलियावर क्रुझ पाहिली तेव्हा तिच्या प्रेमातच पडलो. मला असे वाटते मी तिथे असायला हवे होते. मला वाटतं तिथे अनेक लोकं होती. तेव्हा आर्यनशिवाय एनसीबीला दुसरं कोणी दिसलं नाही का, असा प्रश्न त्यानं एनसीबीला केला आहे. एवढ्या मोठ्या क्रुझमध्ये फक्त आर्यनच फिरत होता का, हा सवालही त्यानं उपस्थित केला आहे. हद्द झाली आता. या शब्दांत मिकानं आपला राग व्यक्त केला आहे.
हेही वाचा: आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ
हेही वाचा: ड्रग्जविषयी आर्यन कोडवर्डमधून बोलायचा, काय होता कोर्टातील युक्तिवाद
Esakal