पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आणि मॉडेल (model) स्वाती हनमघर (swati hanamghar) यांनी नुकत्याच राजस्थान मधील जयपूर येथे पार पडला. हनमघर यांनी अग्रनामांकित अशा राष्ट्रीय पातळीवरील ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या स्पर्धेत दुहेरी यश संपादन केलं आहे. ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ स्पर्धेच्या त्या फस्ट रनरअप ठरल्या आहेत. तसेच या स्पर्धेत त्यांना मिसेस फोटोजेनिक हा पुरस्कारही मिळवला आहे. ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या स्पर्धेचा यंदा 5 वा सीजन होता, यावर्षीची थीम ‘नारी तू नारायणी’ अशी होती. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न आणि स्पार्कल डिझायनर आउटफिट्स थीम असे तीन राऊंड ठेवण्यात आले होते. या तीन राउंड्स मधून सिलेक्ट झालेल्या टॉप फाइनलिस्ट मॉडेल्स या टाइटल क्राउन साठी पात्र ठरल्या होत्या. असे अभिनेत्री स्वाती हनमघर यांनी सांगितले. ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’स्पर्धेतील यशाबद्दल बोलताना अभिनेत्री स्वाती हनमघर म्हणाल्या की, हरिष सोनी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत मिस आणि मिसेस अशा दोन्ही गटात स्पर्धक सहभागी होत्या त्यात क्लासिक आणि गोल्ड अशा कॅटेगिरी होत्या, त्यातील क्लासिक मध्ये मी होते. यात मला ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक हे टायटल असे दोन क्राऊन मिळाले आहेत.

या पूर्वी मी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे, मात्र त्या पेक्षा वेगळा अनुभव या स्पर्धेतून मिळाला आहे. ग्रूमर, मेंटर यांच्याकडून शिकायला मिळाले, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म होता, आमचा कॉन्फिडन्स दुप्पट वाढला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानिमित्ताने मला सांगावे वाटते की, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्यात असलेल्या गुणांचे आत्मविश्वासानं सादरीकरण करा आणि आपण करत असलेल्या कामावर प्रेम करा मग तुम्ही वयाचा विचार न करता स्वतःला सिद्ध करू शकता, आज माझ्या कुटुंब, मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या प्रेरणेमुळे मी बालपणी बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे.े

हेही वाचा: आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ
हेही वाचा: हे बरंय! आर्यन खानचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढतायेत लाखांनी
Esakal