बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणून सोनम ओळखली जाते. सोनम नेहमीच सोशल मीडियावर तिचा जलवा दाखवत असते. परंतु कधीकधी फॅशन स्टाईलमुळे सोनम ट्रोलही होते. नुकतेच सोनमने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये सोनम कपूर व्हाईट ड्रेस घातलेला दिसत आहे. सोनम कपूरचा हा ड्रेस प्रचंड चर्चेत आला आहे.
या ड्रेसमधील वेगळेपण म्हणजे त्यावर बनवलेल्या फिमेल बॉडीची फिगर, जी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोनम कपूरने या ड्रेसवर केस बांधले आहेत. याड्रेससोबत रेड लिपस्टिक आणि इयरिंग्स देखील तिला छान दिसत आहेत.
या ड्रेसबाबत सोनम सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काहीजण सोनमच्या ड्रेसची तुलना पडद्यासोबत करत आहेत, तर काहीजण त्याला चादर म्हणत आहेत.
तसे, सोनम कपूर तिच्या आऊटफिटमध्ये नेहमी काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहते. पण यावेळी तिची स्टाईल पाहून काहीजण विचारात पडले आहेत. सोनमचा हा ड्रेसकोड पाहून लोकांना समजत नाहीयेय की ते नेमकं काय आहे?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here