हिंग पोटाच्या अनेक समस्यांवर उपचार करते. यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटोरी गुणधर्म आहेत जे अपचन आणि पोट खराब होण्यासारख्या समस्यांवर उपचार करतात.

जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्ही दिवसातून किमान 2-3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते, तसेच अन्न पचन करण्यास मदत करते.

जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर जेवण केल्यानंतर रोज बडीशेप नक्की खा. बडीशेप खाल्ल्याने अन्न लवकर पचते, तसेच पोट थंड राहते.

औषधी गुणांनी समृद्ध असलेले अद्रक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अद्रक केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर पचन व्यवस्थित ठेवते.

पोटाच्या समस्यांवर दही हा सर्वोत्तम उपाय आहे. पोटात जळजळ होत असल्यास दह्याची लस्सी किंवा साधी दही खाऊ शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here