कराची: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट हा विषय नेहमीच संवेदनशील असतो. या विषयाबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते, त्यावेळी दोन्ही बाजूच्या चाहत्यांची एकमेकांशी शाब्दिक चकमक होते. कोरोना काळात पाकिस्तानचे काही माजी खेळाडू भारतीय संघाशी मैत्रिपूर्ण क्रिकेट सामने खेळण्याचा प्रस्ताव ठेवत होते. पण त्यांच्या प्रस्तावाला भारतीय खेळाडूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून शकला नाही. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक याने, ‘टीम इंडिया पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला घाबरते’, असे विधान केले.

हेही वाचा: “तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी”

पाकिस्तानच्या संघाकडे वेगवान गोलंदाज आहेत. त्या तोडीचे गोलंदाज भारतीय संघात आहेत का? असा प्रश्न अब्दुल रझाकला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उत्तर दिले, “भारतीय क्रिकेटर्स पाकिस्तानशी स्पर्धा करूच शकन नाहीत. पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंची प्रतिभा वेगळ्याच स्तराची आहे. त्याची बरोबरी होऊच शकत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत ही बाब चांगली नाही”, असं रझाक म्हणाला.

अब्दुल-रज्जाक

अब्दुल-रज्जाक

हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाक सामन्याला डिमांड, तिकीटं 300 पट महागडी

“दोन संघात सामने होत राहिले तर दोन्ही देशाच्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. ती गोष्ट सध्या दिसून येत नाही. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ठराविक अंतराने सामने होऊ लागले तर या सामन्यांमध्ये पाकिस्तानचे खेळाडू भारतीय क्रिकेटर्सपेक्षा खूप जास्त प्रतिभावान आहेत हे स्पष्ट होईल. भारताचे खेळाडू पाकिस्तानचा सामनाच करू शकत नाहीत. म्हणून ते भारताशी सामने खेळत नाहीत”, अशी दर्पोक्ती रझाकने केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here