सणासुदीच्या काळात सर्वांना छान तयार व्हायला आवडते. सुंदर ड्रेस आणि साडी नेसून थोडासा मेकअप करुन छान दिसायाला कोणाला नाही आवडंत, पण मेकअप केल्यानंतर जर तुम्हाला त्यावर चश्मा लावावा लागत असेल तर खूप चिडचिड होते. पण, तुम्ही जर फेस्टिव्ह सिझनमध्ये चश्मा वापरण्याऐवजी लेन्स वापरले तर आणखी खास दिसाल.

आजकाल लोकांना ऑनलाईन शॉपिंग करण्याची सवय झाली आहे. काहीही हवे असेल तरी आपण ऑनलाईन सर्च करतो. पण विना चेक-अप लेन्स खरेदी करणे खूप मोठी चूक ठरू शकते

सध्या डोळ्यांच्या रंगानुसार वेगवेगळ्या रंगाच्या लेन्स वापरण्याचा ट्रेन्ड सुरु आहे. पण अशावेळी काहीही झाले तरी स्वत:च्या लेन्स कोणालाही देऊ नका. कारण तसे केल्यास बॅक्टेरियाचा संक्रमन होऊ शकते आणि डोळ्यांच्या समस्या उद्रभवू शकतात.
कॉन्टक्ट लेन्स मुळे डोळे लाल नाही पण जर व्यवस्थित काळजी नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचे डोळे लाल होऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामुळे त्रास वाढू शकतो. कित्येक लोकांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
कॉन्टेक्ट लेन्सचा वापर करताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासोबत तुम्हाला लेन्स व्यवस्थित डोळ्यात घालावी लागेल. कॉन्टेक्ट लेन्सला हा लावण्यापूर्वी आपले हाथ स्वच्छ धूवून आणि सुकवून घ्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here