प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचा हॉट अंदाज, प्रियकर अर्जुन कपूर यामुळे तिची नेहमीच चर्चा होत असते. तीन ऑक्टोबरला कपिल शर्मा शो मध्ये इंडिया बेस्ट डान्सर या रिएलिटी शो चे तीन जज आले होते. मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस उपस्थित होते. कपिल शर्मा शो मध्ये इंडिया बेस्ट डान्सरच्या पुढच्या सीझनचं प्रमोशन करताना तिघांनी प्रचंड धम्माल केली. कपिल शर्माने या कार्यक्रमात तिन्ही जजच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील काही गमतीशीर कमेंटस काढल्या व त्याचे वाचन सुरु केलं. मलायका लस टोचतानाचा एक फोटो आहे. त्यावर एकाने “कुठलीही लस टोचा तुम्हाला ताप येणार नाही, कारण तुम्ही स्वत:च हॉट आहात, एकदा लव्ह यू राजेश बिकानेरी लिहा”मलायकाने त्या कमेंटची दखल घेत ‘आय लव्ह यू राजेश बिकानेरी’ असे लिहिले आहे. मलायका अरोरा अरबाज खानपासून विभक्त झाली असून आता ती स्वतंत्र राहते.
तिचा हॉट अंदाज, प्रियकर अर्जुन कपूर यामुळे तिची नेहमीच चर्चा होत असते.