नागपूर : खाताना दातात अन्नकण अडकून बसतात. चूळ भरल्यानंतरही काही अन्नकण निघत नाहीत. अशावेळी टूथपिकचा वापर केला जातो. दातांमध्ये अडकलेले अन्नकण जोर देऊन बाहेर काढण्यासाठी प्लॅस्टिक अथवा लाकडाची टोकदार टूथपिक वापरली जाते. यामुळे अन्नकण निघण्यास मदत होते पण नियमित वापर होत राहिला तर दातांचे मोठे नुकसान होऊ शकते. यासंबंधी माहिती घेऊ या…

दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्नकण टूथपिकच्या साहाय्याने काढताना हिरड्यांना इजा होऊ शकते. हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे यासारखे धोके संभवतात. टूथपिकमुळे दातांनाही धोका पोहोचतो.
प्रत्येक वेळी एकाच जागी टूथपिकचा वापर होत राहिला तर दातांमधील फट वाढत जाते आणि तिथे अन्नकण अडकत राहतात. यामुळे दातांमध्ये कॅवटी होण्याचा धोका बळावतो.
बऱ्याच जणांना टूथपिक चावत बसण्याचा नाद असतो. मात्र, ही बाब दातांवरील सुरक्षा आवरणाला धोका पोहोचणारी ठरते. प्लॅस्टिक अथवा लाकडाची टूथपिक चावत राहिल्याने आवरण नाहीसे होते.
दररोज टूथपिकचा वापर होत राहिल्यास दातांची चमक नाहीशी होते. दात पिवळसर दिसू लागतात.
जास्त काळपर्यंत दातांमध्ये अन्नकण अडकून राहिले आणि नंतर टूथपिकच्या साहाय्याने काढले तरी तोंडाचा दुर्गंध कमी होत नाही. शिवाय टूथपिकने जखम झाल्यास अन्न-पाणी घेताना वेदना सहन कराव्या लागतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here