IPL 2021 MI vs RR: दुबईत सुरू असलेल्या स्पर्धेत आज मुंबई आणि राजस्थान संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबईच्या संघाने १२ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला असून १० गुण कमावले आहेत. राजस्थानची स्थिती देखील सारखीच आहे. पण नेट रनरेटचा विचार करता राजस्थानचा संघ मुंबईपेक्षा सरस आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईचा संघ त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. त्याचा फटका त्यांना बसला असून पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. या दरम्यान सुनील गावसकर यांनी मुंबईच्या संघासाठी सर्वात मोठा धक्का नक्की कोणता, यावर मतप्रदर्शन केले.

हेही वाचा: IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

“हार्दिक पांड्या सामन्यांमध्ये गोलंदाजी करत नाही हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे. केवळ मुंबईच्या संघासाठीच नव्हे तर टीम इंडियासाठीही हा एक मोठा धक्का असू शकतो. कारण, हार्दिकला संघात केवळ फलंदाज म्हणून घेतलेलं नाही तर अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतलं आहे. जर एखादा खेळाडू सहाव्या-सातव्या नंबरवर खेळायला येत असेल आणि तो गोलंदाजी करण्यासाठी सक्षम नसेल तर मात्र कर्णधारासाठी ती बाब अडचणीची ठरू शकते. कारण अशा वेळी कर्णधाराला निर्णयांमध्ये लवचिकता ठेवता येत नाही”, असे सुनील गावसकर म्हणाले.

हेही वाचा: “तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी”

Hardik-Pandya-MI

Hardik-Pandya-MI

“सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या फॉर्मबद्दल बोलायचं झालं तर त्यांना भारतीय संघात स्थान मिळाल्यापासून त्यांचे क्रिकेटवरील लक्ष थोडं कमी झालं आहे असं वाटतं. कदाचित माझा अंदाज चुकीचाही असू शकतो पण ज्या प्रकारचे बेजबाबदार फटके खेळून ते बाद होत आहेत, त्यावरून असंच वाटतं. काही वेळा शांतपणे विचार करून फटकेबाजी केली तर त्याचा संघाला फायदा होतो. मुंबईच्या काही खेळाडूंचे फटके चुकत आहेत त्यामुळे संघाला धक्का बसतोय”, असं निरिक्षण त्यांनी नोंदवलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here