सध्या वर्क फ्रोम होम सुरू असल्याने सर्वजण घरीच आहेत. त्यामुळे खाण्यावर कंट्रोल उरलेला नाही कधीही मनात आलं की स्वयंपाकघरात जाऊन खाता- पिता येतं. दिवसभर मिटींग असलया की जरा कमी खाल्लं जातं. मग संध्याकाळी मात्र काय खाऊ- काय नाही असं होऊन जातं. संध्याकाळी हलकं फुलकं खाल्ल की रात्री परत हेवी जेवण केलं जातं आणि दिवसभर काम करून थकल्याने लगेच झोपायला जाण्याकडे अनेकांचा कल असतो. पण असे केल्याने शरीरातील पित्त वाढण्याचा, गॅसेस होण्याचा धोका तर असतोच शिवाय वजनावरही परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याचा विचार करता रात्री काही गोष्टींचा बॅलन्स साधणे गरजेचे आहे. त्यासाठी साधेच उपाय करायचे आहेत.

भारतीय बुफे डिनर

भारतीय बुफे डिनर

खूप जेऊ नका

रात्री अनेकांचा पोटभर जेवण करण्याकडे कल असतो. पण पचायला हलके असे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. यासाठी आहारात सूप, सॅलेड्स खाणे कधीही चांगले. पण पोटात थोडी जागा ठेवणे कधीही चांगले.अतिजेवणाने पोटावर ताण येऊन पचनक्रियेत अडथळे येत शरीरावर मेद साचायला सुरूवात होते. त्यामुळे रात्री जेवणताना मर्यादेतच जेवावे

हेही वाचा: भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी

झोप आणि आरोग्य समस्या

झोप आणि आरोग्य समस्या

जेवल्यावर लगेच झोप नको

काहींना रात्री उशीरा आरामात जेवायची सवय असते. तर काहींचे कामच रात्री उशीरापर्यंत चालत असल्याने पर्याय नसतो. पण अशा लोकांनी जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचे अंतर ठेवणे फायद्याचे ठरेल. असे झाले नाही तर आरोग्याला अपाय होण्याची शक्यता असते.

जर लय ताण असेल तर हे फळ खा अहमदनगर बातमी

जर लय ताण असेल तर हे फळ खा अहमदनगर बातमी

रात्री फळे खाऊ नये

जेवल्यावर अनेकांना फळे खाणे आवडते. पण अशाप्रकारे फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण जेवण आणि फळे एकदम पचू शकत नाहीत. योग्य पचन झाले नाही तर आपल्या शरीरात फळांचे योग्य पोषण होणार नाही. तसेच जेवणाचाही परिणाम होणार नाही. त्यामुळे रात्री एकतर फळेच खावीत किंवा जेवावे.

हेही वाचा: Navratri 2021: नवरात्रीमध्ये हटके लूक हवायं?; ट्राय करा या Saree Draping स्टाईल

गोड बुंदी

गोड बुंदी

गोड पदार्थ टाळावेत

कॅलरीज जास्त असल्याने रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाणे टाळावे. रात्री जेवणानंतर शारीरीक हाचलाचींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे पदार्ख लवकर पचत नसल्याने अपायच होण्याची शक्यता जास्त असते.

पिण्याचे पाणी

पिण्याचे पाणी

गार पाणी पिणे टाळा

अनेकांना फ्रिजमधील गार पाणी पिणे आवडते. रात्री जेवण झाल्यावर जर असे गार पाणी प्यायले तर पचनसंस्था आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही सवय टाळावी.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here