खूप भूक लागलीय, पटकन काहीतरी खायला हवय. तर असा केला जाणारा पदार्थ म्हणजे नूडल्स, म्हटलं तर दोन मिनीटात होणारा. नाहीतर विविध भाज्या आणि सॉसेस घालून होणारे हे नूडल्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मैद्यापासून सारखे खाल्ले जाणारे पदार्थ हानिकारक असल्याने आता गव्हाच्या पिठापासूनही नूडल्स मिळायला लागल्या आहेत. त्याच्याही पुढे जात पालक, बीट, गाजर यांचे नूडल्स मिळतात. हे नूडल्स नेमके आले कुठून हे मात्र वादातीत आहे.
येथे आढळतात उल्लेख
नूडल्सचा उल्लेख पहिल्यांदा चीनच्या तिसऱया शतकातील शब्दकोशात केल्याचे पुरावे सापडले आहेत.. तर पाचव्या शतकात जेरूसलम ताल्मुदमध्ये इट्रिअम नावाने त्याचा उल्लेख आढळतो. इ. पू. 100 मध्ये ग्रीकमध्येही लॅगोन नावाचे पसरट नूडल्स खाल्ले जायचे. चीनमध्ये सहाव्या शतकात नूडल्सला मुख्य पदार्थ म्हणून मान्यता मिळाली. हंगेरियन नवव्या शतकात जेव्हा पूर्व युरोपवर आक्रमण करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी गव्हाच्या लगद्यापासून तयार केलेले छोटे तुकडे आणले होते. भाज्या शिजवताना ते हे तुकडे टाकत. ते शिजून खाल्याने पोट भरत असे.
हेही वाचा: Health tips : दूध, दह्याच्या नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी

मखनी मॅगी
नूडल्स होते शंकरपाळ्यासारथे
पसरट आकाराच्या चायनिज कढई असलेल्या वोकमध्ये पिठाच्या गोळ्यापासून बनवलेले शंकरपाळ्याचे तुकडे गरम पाण्यात शिजवले जायचे. हे तुकडे म्हणजे नूडल्सचे खरे रूप. त्याला मियान पियान असे संबोधले जाते. उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हेच नूडल्स आजही खाल्ले जातात. नुडल्सच्या आकारामुळे त्याची तुलना पास्ताबरोबर कायम केली जाते.
पास्ता, नूडल्समध्ये वाद
इटलीचा पास्ता आणि चायनिज मीयान करण्याची कृती अगदीच एकसारखी. रोम शहरात उत्खननात अडीच हजार वर्षांपूर्वी पास्ता बनविण्याचे साचे मिळाले. तर 1999 साली चीनच्या लाजिया या गावात झालेल्या उत्खननात मातीच्या वाटीत नूडल्सचे अवशेष मिळाले. तसेच ग्रीस आणि पर्शियामध्येही उत्खननात सापडल्याचे पुरावे आढळतात.
हेही वाचा: Narcissism म्हणजे काय? करिअरचा ग्राफ वाढवण्यात असू शकतो महत्वाचा वाटा
ओ प्रकार लोकप्रिय
चिंचे दान
व्हिएतनामी फो
जपानचे रामेन
साऊथ कोरियाचे जपचे
थायलंडचे पड थाई
बर्माचे मोहिंगा
इंडोनेशियाचा बॉक्सो
सिंगापूर मध्ये Hokkien मी
मलेशिया लक्ष
मोरापासून खा
Esakal