विनोद खन्ना हे सत्तरच्या दशकातले आघाडीचे आणि हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही त्यांनी ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले. ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुरबानी’, ‘हेराफेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

विनोद खन्ना यांचा पेशावरमध्ये एका पंजाबी व्यावसायिक कुटुंबात जन्म झाला होता. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा विनोद खन्ना यांच्यावर फार प्रभाव होता. याच चित्रपटामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली, असं म्हटलं जातं.
मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी विनोद खन्ना यांनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती.
१९८२ साली त्यांनी ओशो रजनीश या गुरुंचा मार्ग स्वीकारला होता. त्यावेळी ते करिअरच्या परमोच्च शिखरावर होते. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी इंडस्ट्रीत कमबॅक केलं.
विनोद खन्ना यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चित्रपट विशेष गाजले. ‘हेराफेरी’, ‘खून पसिना’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘परवरिश’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ यांमध्ये दोघांनी स्क्रीन शेअर केलं होतं.
चित्रपटाबरोबरच राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यातही ते यशस्वी ठरले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here