पुणे – शहरातील सदनिकांची विक्री व नवीन प्रकल्प सुरू होण्यामध्ये गेल्या तिमाहीत अनुक्रमे ९४ आणि २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत नऊ हजार ५६५ सदनिकांची विक्री झाली असून ८ हजार ६१५ सदनिका असलेल्या प्रकल्पांची नोंद करण्‍यात आली आहे.

मालमत्ता सल्‍लागार कंपनी ‘नाइट फ्रँक इंडिया’कडून ‘इंडिया रिअल इस्‍टेट अपडेट-क्यू : ३’ हा गेल्या तिमाहीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार शहरात १.० दशलक्ष चौरस फूटसह कार्यालयीन व्‍यवहारांमध्‍ये मोठी वाढ नोंद नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत पूर्ण झालेल्‍या नवीन बांधकामांचे क्षेत्र २.५ दशलक्ष चौरस फूट होते. २०२१च्‍या पहिल्‍या नऊ महिन्‍यांसाठी एकत्रित कार्यालयीन व्‍यवहार २.१ दशलक्ष चौरस फूट नोंदवण्‍यात आले आहेत.

या बाबी ठरल्या महत्त्वाच्या

स्‍टॅम्‍प ड्युटीमध्‍ये करण्‍यात आलेली कपात पहिल्‍या तिमाहीमध्‍ये संपुष्टात आली

कोरोनाची दुसरी लाट आणि करसवलत थांबल्याचा परिणाम दुसऱ्या तिमाहीच्या विक्रीवर झाला

तरी शहरातील निवासी बाजारपेठेत तिसऱ्या तिमाहीत लक्षणीय सुधारणा झाली

गृहकर्जचे कमी व्‍याजदर, आकर्षक किमती आणि हप्त्यांमधील सवलत गृहखरेदीदारांसाठी सकारात्‍मक

अशीच स्थिती कायम राहिल्यास चौथ्‍या तिमाहीत विक्री कायम राहण्याची शक्यता

पुणे हे आयटी हब असण्यासह एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये चारशेहून अधिक उत्‍पादन कंपन्या आहेत. वाहन क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे उत्‍पादन पुणे जिल्ह्यात होते. त्यामुळे पुणे शहर आशियामधील सर्वात मोठ्या उत्‍पादन केंद्रांपैकी एक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आर्थिक स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शहरातील कार्यालयीन जागांना चौथ्या तिमाहीत मोठी मागणी निर्माण होण्‍याची अपेक्षा आहे.

– रजनी सिन्‍हा, राष्‍ट्रीय संचालक, अर्थशास्‍त्रज्ञ व संशोधन, नाइट फ्रँक इंडिया

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here