
अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडमध्ये तिच्या पारंपरिक लूकसाठी खूप प्रसिध्द आहे. आजकाल तिचा साडीचा लूक देखील चांगलाच चर्चेत आहे.

विद्याची ही बनारसी साडी फॅशन डिझायनर गौरंग शाहनं डिझाईन केलीय. विद्या खूपदा साड्यांमध्ये पहायला मिळतेय.

विद्या अनेकदा साडीमध्ये अॅवॉर्ड शो आणि पार्ट्यांमध्ये दिसलीय. ती तिच्या पारंपरिक साडीतल्या लूकनं चाहत्यांची मनं जिंकतेय.

विद्याला तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील साड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे जवळजवळ सर्व प्रकारच्या साड्यांचा संग्रह आहे.

विद्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुंदर साड्यांच्या फोटोंनी भरलेलं आहे. अलीकडेच तिने लाल साडीतील फोटो शेअर केलेत.

डिझायनर गौरंग शाहाने डिझाईन केलेली बनारसी लाल साडी सोनेरी रंगाच्या छटांनी मडवलीय. साडीच्या पल्लूला जाड बॉर्डर आहे, ज्यावर सोनेरी नक्षी डिझाइन करण्यात आलीय. विद्याचे इन्स्टाग्रामवर 3.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Esakal