विसापूर (सातारा) : जरंडेश्वर कारखान्यावर (Jarandeshwar sugar Factory) सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी प्रथमच जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. या भेटीनंतर ते पुसेगाव येथे आले असता, उत्तर खटावमधील जरंडेश्वर कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच जरंडेश्वर कारखाना हिताचा असल्याची भावना व्यक्त करून निवेदन दिले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की श्रीमती शालिनीताई पाटील, त्यांचे बंधू वसंतराव फाळके, संचालक व नातलग यांच्या मार्फत कारखाना बंद पडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आपण दूरदृष्टी ठेऊन हा कारखाना आहे, त्या व्यस्थानामार्फत योग्य पद्धतीने कसा चालेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि मुळात ज्यांनी भ्रष्टाचार करून कारखाना बंद पडलाय, त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठी आंदोलन करावे. तसेच ऊस उत्पादकांसोबतच कामगार, ऊस वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आलीय.

हेही वाचा: दादा, आम्हालापण ‘संचालक’ करा की..

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या

तसेच शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जरंडेश्वर कारखान्याने कधीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबतीत राजकारण केले नाही. थेट शेतकऱ्यांशी संपर्क ठेवत कारखान्याने कायम शेतकरी हित जोपासले आहे. एफआरपी एवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त दर देण्याचे काम याच कारखान्याने केले आहे. कोणताही गाजावाजा न करता, उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जातात. योग्य दर, अचूक वजन काटा, वेळेत उसाची नियोजनबध्द तोडणी, ऊस विकास योजना, कार्यक्षम तोडणी यंत्रणा यासह सीएसआरमधून तालुक्यातील गावांमध्ये विकासकामे केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हित जोपासून चांगला चाललेला हा कारखाना राजकारणाच्या माध्यमातून बंद पडतो की काय, ही भीती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. या चिंतेने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे देखील या निवेदनामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: ‘सोमय्या साहेब, सत्तेच्या घशातील आमचा कारखाना आम्हाला परत मिळवून द्या’

कारखाना बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : किरीट सोमय्या

शेतकऱ्यांच्या निवेदनाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले, कारखाना बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऊस उत्पादकांसोबतच कारखान्यावर अवलंबून असणारा कामगार, ऊस वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर हा घटक देखील तितकाच महत्त्वाचाच आहे. पण, हे होत असताना काही चुकीचं घडत आहे का? हे देखील तपासण तितकचं महत्त्वाचं आहे. कारखान्याबाबत कुणीही राजकारण करत नाही. राजकारण होत आहे ते घोटाळ्यांचं. कारखाना चांगला चालावा यात दुमत नाही, मात्र जनतेची लूट करून चालावा हे मंजूर नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, असेही त्यांना आश्वासन दिले.

हेही वाचा: भाजपला ‘जोर का झटका’; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here