वायनाड: केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला (Congress Party) आणखी एक धक्का बसला असून मंगळवारी माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) अध्यक्ष पीव्ही बालचंद्रन (P. V. Balachandran) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. देशातील भाजपाचा विकास रोखण्यात सर्वात जुना पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप बालचंद्रन यांनी केलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी वायनाडमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे बालचंद्रन यांचा राजीनामा हे पक्षाचे मोठे अपयश असल्याचे मानले जात आहे.
माजी आमदार के. सी. रोसाकुट्टी, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन आणि डीसीसी सरचिटणीस अनिल कुमार यांनी या वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Kerala Assembly Election) काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता बालचंद्रन यांच्या राजीनाम्यांनी केरळात काँग्रेसची पुरती वाताहत झालीय. तब्बल 52 वर्षे बालचंद्रन काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळवून दिलंय.

पीव्ही बालचंद्रन
हेही वाचा: भाजपला ‘जोर का झटका’; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
पत्रकार परिषदेत बालचंद्रन यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दिशा गमावलेल्या पक्षासोबत लोक उभे राहणार नाहीत. काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीका केली. लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर ते स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. केवळ बहुसंख्यांकच नव्हे, तर अल्पसंख्यांकही काँग्रेस सोडत आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: ‘जरंडेश्वर’ची पवार कुटुंबीयांकडून पळवा-पळवी करून लपवा छपवी’
Esakal