तुमच्या मित्राने अकाऊंट असताना पुन्हा फेसबुकवर अकाऊंट उघडले. तुम्ही त्याच्या मित्र यादीत आलात आणि काही दिवसांनी अचानक त्याने फेसबुकवरून पैशांची मागणी केली. तर त्याच्या वागण्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही मित्र त्याला शिव्या वगैरै देऊन हलक्यात घेतील. काही जण त्याला फोन करून काय प्रोब्लॅम आहे याची चौकशी करतील. तेव्हा त्या मित्रालाही आपल्या नावाचा गैरवापर करून कोणीतरी हे करतय याची कल्पना येईल. असे काहीसे प्रकार आजकाल सर्रास घडत आहेत. याची तक्रार सायबर पोलिसांकडे करता येते. सायबर पोलिसांकडे तक्रार करताना खालील गोष्टी करा.

फेसबुक

फेसबुक

1) ज्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून तयार केलेले फेक अकाऊंट शोधा.

2) स्वतःला फेक अकाऊंट शोधताना अडचणी येत असतील तर तर ज्यांना फेक प्रोफाईल वरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून या प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवून घ्या.

3) त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर प्रोफाईलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा.

4) तुमच्यासमोर Find Support or Report File हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

5) Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

6) आता तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील -Me, A Friend आणि Celebrity.

7) तुम्ही तुमची बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी ME हा ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स करा. फेक प्रोफाईल अकाऊंट काही वेळाने बंद होईल.

8) याशिवाय तुमचे फेसबुकवरील मित्र-मैत्रीणीही वरील प्रमाणे बनावट अकाऊंटवर फेक प्रोफाईल म्हणून रिपोर्ट करू शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here