जगभरामध्ये लॉकडाऊन रद्द केला आहे. लॉकडाऊन नंतर कपल पुन्हा एकमेकांना भेटू शकत आहेत, डेटवर जाऊ शकत आहेत; पण कोरोनाकाळ अजून संपलेला नाही त्यामुळे पार्टनर सोबत डेटवर जाताना काळजी घेतली पाहिजे.
कोरोना काळात डेटवर जाताना काय काळजी घ्यावी याबाबत आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्या नक्की फॉलो करा.
डेटवर जाण्याआधी तुम्ही चिंताग्रस्त असाल किंवा चिडचिड होत तर हे साधारण लक्षण आहे. कारण कोरोनाकाळात बहुतांश लोक चिंताग्रस्त असल्याचे, चिडचिड करत असल्याचे लक्षण दिसत होते. जे लोक एकटे राहतात त्यांच्यामध्ये ही लक्षण जास्त दिसून येतात त्यामुळे घाबरू नका.

– जोपर्यंत तुम्ही मानसिकरित्या तयार होत नाहीत तोपर्यंत डेटवर जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी, तुम्ही मानसिकरित्या तयार आहात की नाही याचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स वाटत नसेल तोपर्यंत डेटवर जाऊ नका.

– कोरोना अजून संपलेलेला नाही, त्यामुळे डेटवर जाण्याआधी मास्क वापरा.
– फिजिकल डिस्टंसिंगकडे लक्ष द्या, आणि शक्य असल्यास आऊटडोअर मिटिंग प्लॅन करा. फिजीकल कॉन्टक्ट टाळा.
– कोरोना काळात डेटवर जात असाल तर चालत चालत गप्पा मारण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे चालताना ठराविक अंतर राहील आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नही करता येईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here