चाळीशी जवळ आली की अनेकांना आता आपलं अधिक वय वाढलय, कसं होणार या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं. मग अनेकजण ऋजुता दिवेकर, दिक्षीत डाएट प्लॅन करतात. तोही उत्साह काही दिवस टिकतो. मग इंस्टावर मिलींद सोमण, शिल्पा शेट्टी, मलायका अऱोरा, करीना कपूर यांचे व्यायामाचे फोटो पाहिले की यांच्यासारखं आपल्याला जमेल का? असं वाटायला लागतं. या सगळ्यांची एक पक्की गोष्ट म्हणजे सातत्य. कंटाळा न करता दररोज सकाळी हे सेलिब्रिटी व्यायामाला महत्व देतात. योग्य आहार घेतात. आपणही असेच स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.

चाळीशी जवळ आली की काही आजार डोके वर काढायला लागतात. ते होऊ नये म्हणून जरा स्वतःकडे अधिक लक्ष देऊन संतुलित आहार आणि जमेल तेवढा व्यायाम करणे गरेजेचे आहे. कारण चाळीशीत शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते. अतिरिक्त चरबी साठून शरीर बेढब दिसायला सुरूवात होते. त्यामुळे चिडचिडेपणा अधिक वाढतो. म्हणूनच स्वतःकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टीप्स फॉलो करा.

निरोगी अन्न
जेवणात हे पदार्थ खा
रोजच्या जेवणात तृणधान्ये, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश अवश्य असावा. फळभाज्याही खाव्यात. फळे खावीत. जे पदार्थ खाऊन शरीराला कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आदी परिपूर्ण घटक मिळतील हे पाहाणे गरजेचे आहे.

दूध पिणे
कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड हवेच
शरीरातील कॅल्शिअम चाळीशीनंतर कमी होत जाते. हाडे ठिसूळ होत जातात. त्यामुळे दुधाच्या पदार्थांचा आवर्जून अन्नात समावेश करावा. फॉलिक अॅसिडसाठी डाळी, फळे, खजूर, गुळ-शेंगदाणे, बीट गाजर आदींचे नियमित सेवन करावे.

अभिनेत्री मलायका अरोरा जिममध्ये डान्स करताना कसरत करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला
व्यायामाला महत्व द्यावे
करीना, मलायका, शिल्पा या अभिनेत्री नियमित योगासने, वर्कआऊट, सुर्यनमस्कार करण्यावर भर देतात. योगासनांमुळे तुमचे मन शांत राहते. मनाची एकाग्रता वाढते. जर जीमला जाणे शक्य नसेल तर तुमच्या सोसायटीत असलेल्या जागेतही तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता.
Esakal