नागपूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून कोणीही सुटलेला नाही. प्रचंड काम, प्रवास, घराची जबाबदारी यामुळे ताण वाढतोच. शिवाय काही सवयींमुळेही ताणात भर पडते. कोणत्या आहेत या सवयी? चला जाणून घेऊ.

काही लोक छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करतात. या अतिविचारामुळे ताणात भर पडते.
माणसाला शांत झोपेची गरज असते. पुरेशी झोप मिळाली की दिवस उत्साहात सुरू होतो. अपुऱ्या झोपेमुळे मात्र खूप चिडचिड होते व ताण वाढतो. त्यामुळे दररोज किमान सहा ते आठ तासांची झोप घ्यायला हवी.
अव्यवस्थितपणामुळेही ताण वाढतो. घरात किंवा ऑफिस डेस्कवर खूप पसारा असेल तर ताणात भर पडते. हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवा. घर आवरून ठेवा. उगाचच पसारा करू नका.
स्मार्टफोन हा सुद्धा ताणात भर घालणारा घटक आहे. त्यामुळे स्मार्टफोन, सोशल मीडिया यांचा वापर मर्यादेतच करायला हवा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here