बॉलीवूडमध्ये दरवेळी नवनव्या गोष्टींचा खुलासा होत असतो. त्यात अनेक सेलिब्रेटी आपल्याविषयीच्या गोष्टी काही कारणास्तव सोशल मीडियावर शेयर करणं पसंत करत नाही. मात्र ती गोष्ट फार काळ लपूनही राहत नाही. अशीच एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी श्वेतांबरी सोनीशी लग्न केलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यावर कडी म्हणजे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्या लग्नावर विक्रम भट्टला प्रतिक्रियाही दिली आहे. यासगळ्यात श्वेतांबरी कोण आहे हे आपण यानिमित्तानं पाहणार आहोत.

श्वेतांबरी आता फेमस सेलिब्रेटी झाली आहे. त्याचे कारण तिनं प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
विक्रम भट्ट यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांच्या या लग्नाची फारशी कुणाला माहिती नव्हती. त्याबद्दल आता महेश भट्ट यांनी खुलासा केला आहे. विक्रम यांनी महेश यांनाही या लग्नाबाबत काहीही सांगितलं नव्हतं.
श्वेतांबरी ही मेक अप आर्टिस्ट नम्रता सोनी यांची बहिण आहे. तिच्या लग्नाच्या वेळी तिनं काही फोटो पोस्ट केले होते. त्यात आपली बहिण किती सुंदर दिसते हे तिनं सांगितलं होतं.
श्वेतांबरीला बॉलीवूडमध्ये फारसं कुणी ओळखत नाही. ती अजून फेमस सेलिब्रेटीही नाही. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही. ती एक व्हिज्युलायझर म्हणून कार्यरत आहे.
श्वेताला सोशल मीडियावर हजाराच्या आसपास फॉलोअर्स आहेत. यापलीकडे तिच्याविषयीची फारशी माहिती नाही. सध्या तिच्या इंस्टावर तिचे आणि विक्रम भट्ट यांचे काही फोटो पोस्ट केलेले आहेत.
तिचे पती विक्रम भट्ट बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी गुलाम, राज, कसूर, ऐतबार सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here