टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) इतिहास रचणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Javelin Thrower Neeraj Chopra) आता भारतीय खेळाचा नवा ‘पोस्टर बॉय’ बनलाय. ‘क्रिकेट बॅट’ खरेदी करण्याची स्पर्धा येथे सर्वाधिक असताना नीरजनं देशात ‘भालाफेक’ लोकप्रिय केला. नीरज त्याच्या कर्तृत्वाव्यतिरिक्त ‘फॅशनेबल दुनियेत’ही तो फेमस होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी, नीरजनं Nike Air Jordan 1 स्नीकर परिधान केल्याचं पहायला मिळालं होतं आणि हेच स्नीकर दीपिका पादुकोणनं वर्षाच्या सुरुवातीला घातलं होतं.

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर, नीरज चोप्रानं इंडिया टुडे स्पाइस मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी पहिलं फोटोशूट केलंय. नीरजनं या फोटोशूटसाठी घातलेला स्वेटशर्ट (sweatshirt) ‘फॅशनेबल दुनियेत’ खूप चर्चेचा विषय बनलाय. हा स्वेटशर्ट एडवर्ड लालरेम्पिया (Edward Lalrempuia) यांनी डिझाइन केलाय.

नीरज चोप्रा स्टाईल

नीरज चोप्रा स्टाईल

हेही वाचा: VIDEO : कोलकत्यात गोल्डनमॅन नीरजनं मटण, बंगाली थाळीवर मारला यथेच्छ ताव

या जांभळ्या-काळ्या स्वेटशर्टमध्ये नीरज चोप्रा एकदम आकर्षक दिसतोय. त्यानं काळ्या पँटवर हा स्वेटशर्ट परिधान केलाय. नीरजनं घातलेला हा स्वेटशर्ट मोनोग्राम जॅकवर्ड स्वेटशर्ट Louis Vuitton या ब्रँडचा आहे. LV पींक मद्रास थीमनं हा स्वेटशर्ट पुन्हा ऑनलाइनवर ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिलाय. या स्वेटशर्टची किंमत जाणून घेतल्यावर तुम्हालाही थोडा धक्का बसेल.

नीरज चोप्रा स्टाईल

नीरज चोप्रा स्टाईल

या स्वेटशर्टची किंमत सुमारे 1,09,969 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या स्वेटशर्टची किंमत नीरज चोप्राच्या भालाच्या किंमतीच्या जवळपासच आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ह्या स्वेटशर्टमध्ये 93 टक्के कापूस आणि 7 टक्के पॉलिस्टर वापरला असून हा शर्ट इटलीत बनवण्यात आलाय.

हेही वाचा: ऑलिम्पियन नीरज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; चोप्राला भावली ‘ही’ गोष्ट

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here