आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून शरद केळकरचे नाव घ्यावं लागेल. त्यानं केवळ बॉलीवूडमध्ये काम केलं आहे असं नाही तर वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही त्यानं भूमिका केल्या आहेत. त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. सध्याच्या घड़ीला तो आघाडीचा अभिनेताही आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्याविषयक वेगवेगळ्या आठवणींना दिलेला उजाळा.

शरद केळकर हा टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यानं त्याच्या करिअरची सुरुवात ट्रेनर म्हणून केली होती.
शरदनं अजय देवगणच्या तान्हाजीमध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली होती. कमी कालावधीत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणूनही शरदनं नाव कमावलं आहे. तान्हाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
छत्तीसगढमधल्या जगदलपूरमधून शरद आला असून त्यानं एमबीएची पदवी घेतली आहे. एका प्रसिध्द महाविद्यालयातून त्यानं शिक्षण पूर्ण केलं.
शरदनं अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटामध्ये साकारलेली तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका प्रचंड गाजली. त्यात त्यानं ज्या पद्धतीनं ती भूमिका केली. त्यावरुन तो आणखी लोकप्रिय झाला.
2004 मध्ये त्याला मोठ्या संघर्षानं टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये इंट्री मिळाली. त्यानं त्या संधीचं सोनं केलं. शरदनं आतापर्यत वीसहून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
शरदनं ग्रासिमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर इंडियामध्ये भाग घेतला होता. त्यात तो अंतिम स्पर्धकांच्या यादीत पोहचला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here