बिग बॉस तेलुगू सिझन ३ चा स्पर्धक आणि स्प्लिट्सविलाचा विजेता जय दुधाणे Jay Dudhane हा बिग बॉस मराठी ३ च्या घरातील सर्वांत चर्चेत असलेला स्पर्धक आहे. घरातील सर्वांत दमदार स्पर्धकांपैकी एक जय आहे. मात्र अनेकदा तो त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतो. आपल्या तापट स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात अनेकांशी तो वाद ओढवून घेतो. सध्या सोशल मीडियावर जयविषयीचे काही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी जयला ट्रोल केलं आहे. (Bigg Boss Marathi 3)
बिग बॉसच्या घरात नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये इतर स्पर्धकांनी जयच्या अंगावर आणि चेहऱ्यावर पांढरा रंग टाकला होता. त्याच्या याच फोटोवरून नेटकऱ्यांनी मीम्स बनवले आहेत. शो लाँच होताच दुसऱ्या दिवशी जय आणि मीरा जगन्नाथ यांच्यामध्ये भांडण झालं. या दोघांच्या भांडणावरूनही हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत.
हेही वाचा: TRP: ‘ही’ ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका


बिग बॉसच्या घरात गायत्री दातारशी बोलताना जयने सांगितलं की त्याने आतापर्यंत पाच मुलींना डेट केलं आहे. सातवीत असताना त्याची पहिली गर्लफ्रेंड होती, असं तो गायत्रीला सांगतो. त्याच्या या विधानावरूनही नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. बिग बॉसच्या घरातील जयचा शर्टलेस अंदाज सर्वांनाच ठाऊक आहे. टास्कदरम्यान आणि घरातही तो अनेकदा शर्टलेस वावरताना दिसतो. त्यामुळे बिग बॉसच्या घरात येताना तो त्याचे कपडे आणायला विसरला की काय, असा सवाल करत नेटकऱ्यांनी त्याची मस्करी केली आहे. चावडी स्पेशल भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी जय दुधाणेची चांगलीच शाळा घेतली. यावेळी त्यांनी गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे आणि इतरांनाही सुनावलं.
Esakal