कोरोना काळात कपल्सला काही काळासाठी एकमेकांपासून दूर राहावे लागले होते. अशा लॉन्ग टर्म रिलेशनशिपनंतर कपल्स लग्न करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत लग्न करणार असाल तर तुमचा निर्णय पक्का करण्याआधी काही गोष्टींबाबत थोडा विचार करा. आयुष्यात लग्नाचा निर्णय हा खूप मोठा असतो. लग्न हा आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो त्यामुळे काही गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असू शकते. जर काही गोष्टींकडे आता दुर्लक्ष केले तर नंतर पुढे जाऊन वैवाहिक आयुष्यात खूप समस्या निर्माण होऊ शकतात. चला जाणून घेऊ या कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे?

नाते

नाते

1. वारंवांर टोकणे

एकमेकांच्या भल्यासाठी काही गोष्टी स्पष्ट बोलणे चांगले असते पण वारंवांर जर तुमचा पार्टनर कोणत्या ना कोणत्या गोष्टीला टोकत असेल, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल तर भविष्यामध्ये त्यावरून खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला या मुद्द्यावर पार्टनर सोबत बोलायला हवे.

जोडी

जोडी

२. सतत लक्ष ठेवणे

काळजी घेणारे पार्टनर सर्वांनाच आवडतात, पण काळजी करणे आणि लक्ष ठेवणे फरक असतो. जर तुमच्या पार्टनरला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बारीक नजर ठेवण्याची सवय असेल तर तुम्ही लग्न करण्याची घाई करू नका.

भागीदार

भागीदार

3. गोंधळ

जर तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत फिरायला, पार्टी करायला आवडते पण लग्नाच्याबाबती मात्र जर तो कन्फ्युज असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा! कोणीही एकसारखे नसते, पण जर तुम्ही दोघांचे एकमेकांपासून पूर्ण वेगळे असला, तुमची मत पूर्ण वेगळी असतील तर लग्नानंतर त्यामुळे या गोष्टी भांडणास कारण ठरू शकतात.

  भागीदार

भागीदार

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here