दुबईमध्ये सध्या IPL चा रणसंग्राम सुरू आहे. या स्पर्धेनंतर टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा महिनाभर आधीच करण्यात आली असून निवृत्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून निवडण्यात आलंय. धोनीच्या अनुभवाचा आणि सल्ल्यांचा भारतीय खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. पण सध्या धोनी CSK संघाचे नेतृत्व करत आहे. या संघातील एका उदयोन्मुख खेळाडूला धोनीने एक सल्ला दिला होता. तो सल्ला त्या खेळाडूने तंतोतंत पाळला आणि त्याचा त्याला फायदाही झाला.
हेही वाचा: Net Run Rate नेमकं काढतात कसे? IPL पाहणाऱ्यांसाठी गणिताची उजळणी
चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईला प्ले ऑफ्समध्ये पोहोचवण्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा मोठा वाटा आहे. पण ऋतुराजच्या खेळात सुधारणा होण्यामागे मात्र महेंद्रसिंग धोनीचा हात असल्याचे ऋतुराजचे कोच संदीप चव्हाण यांनी सांगितले. “धोनी नेहमी ऋतुराजला सांगत असतो की सोशल मिडियापासून जरा लांबच राहत जा. फलंदाजीचे धडे देणे, दबाव कसा झेलायचा, आवश्यकतेनुसार धावगती कशी वाढवायची या टिप्स धोनी त्याला देतोच. पण त्यासोबतच धोनीने ऋतुराजला सोशल मिडियापासून लांब राहण्यास सांगितले आहे.”
हेही वाचा: IPL 2021: राजस्थानच्या फलंदाजांनी केलं निराश; ओढवली नामुष्की

रुतुराज-प्रशिक्षक-संदीप-चव्हाण
हेही वाचा: Video: बाबोsss …. असा ‘हवाई थ्रो’ तुम्ही आधी कधी पाहिलाय?
“धोनीने ऋतुराजला असंही सांगितलं आहे की यश आणि अपयश या दोन गोष्टी कोणत्याही माणसाच्या आयुष्यात कायम येतच असतात. त्यामुळे तू त्या गोष्टींमधून धडे घेत राहा पण त्याकडे लक्ष न देता स्वत:च्या खेळावर लक्ष दे. लोकं काय बोलतात, काय टीका करतात त्याकडेही तू लक्ष देऊ नकोस. सोशल मिडियावरील लोकांचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता तू तुझ्या खेळात सुधारणा करत राहा”, असा कानमंत्र धोनीने ऋतुराजला दिला असल्याचे संदीप चव्हाण यांनी सांगितले.
Esakal