जळगाव : कोरोना वैश्विक महामारीने (Corona epidemic) गेले १७ महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले संत मुक्ताबाई मंदिर (Sant Muktabai Temple) मुक्ताईनगर मंदिर आज पहाटे ७ वा. शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार योगायोगाने संत मुक्ताबाई जयंती दिनी नवरात्रौत्सव घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
हेही वाचा: अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना दिलासा;जळगावला मिळणार ३५ कोटी
गेल्या दोन वर्षापासून दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना प्रदिर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष गाभार्यात जावून मुक्ताबाईचे पदस्पर्श करून दर्शन घेता आल्याने आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यामुळे मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
सकाळी अभिषेकाने सुरवात
आज पहाटे आदिशक्ती मुक्ताबाईस मानाची अभिषेक पुजा आरती संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केली. ह्यावेळी पुजारी रविंद्र हरणे महाराज, विनायक व्यवहारे, व्यवस्थापक उद्धव जुनारे, वारकरी सेवा संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, निवृत्ती पाटील, कोळी सर, गणेश अढाव व असंख्य भाविक उपस्थित होते.

प्रवेशद्वार उघडून भाविकांसाठी खुले
मुक्ताबाई मंदिराचे देवास्थानाचे प्रवेशद्वार सकाळी अध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या हस्ते खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून भक्तांना प्रवेश दिला जात होता.
हेही वाचा: Jalgaon:अनैतिक संबंधाचा संशय..डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून
कोरोना महामारीमूळे बंद असलेले धार्मिक स्थळाचे घटनस्थापनेला खुले करण्याचा शासनाच्या निर्णयानूसार मंदिर खुले करण्यात आले. संत ज्ञानदेवांनी आत्मसात केलेले एकांतवासाचा आदीशक्ती मुक्ताईने त्यांना बाहेर काढले होते. आणि जगाचे कल्याणासाठी करण्यात आले. आता हे औलोकिक लाॅकडाऊन मुक्ताबाईच्या जयंतीच्या पर्वावर खुले झाले आहे.
पुजारी- रविंद्र हरणे महाराज
Esakal