आजपासून नवरात्रीला सुरवात झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा घरात सण आणि पूजेचे वातावरण असते तेव्हा घरातील स्त्रिया कामात बिझी असतात. घरातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची त्या काळजी घेतात. घराची सजावट असो किंवा मुलांचे कपडे किंवा स्वयंपाकघरातील कामं, सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर असते. या गडबडीत स्त्रीयांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. नवरात्रीची पूजा आणि घटस्थापनेदरम्यान महिलांना आवरावे लागते आणि अशा परिस्थितीत त्यांना अजिबात वेळ नसतो. चला तर मग अशा काही टिप्स बद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या पूजेत झटपट तयार व्हाल.

कपडे-ज्वेलरी सिलेक्ट करा:
जेव्हा तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही घरगुती कामात बिझी असणार आहात, तेव्हा तुम्ही तयारी अगोदरच करा. तुम्हाला कोणता ड्रेस घालायचा आहे, कोणत्या ड्रेसवर कोणते दागिने घालायचे आहेत, हे आधीच प्लॅन करा. ड्रेस आधीच इस्त्री करून ठेवा.
मॅचिंग एक्सेसरीज:
तुमच्या ड्रेसचे मॅचिंग एक्सेसरीज आधीच काढून ठेवा. जर तुम्ही बांगल्स घालणार असाल तर एक सेट बनवून ठेवा. शेवटच्या क्षणी बिंदी, इयरिंग्स आणि हेयर एक्सेसरीज शोधण्यात आणि निवडण्यात वेळ वाया घालवू नका. कधीकधी घाईघाईत, आपण ठेवलेल्या वस्तू देखील मिळत नाहीत. म्हणून हे सर्व आधीच काढून ठेवा.
हलका मेकअप:
पूजा आणि सणासाठी तयार होण्यासाठी मेकअप करताना, फक्त आपल्या डोळ्यांच्या मेकअपला अधिक महत्त्व द्या. तुमच्या डोळ्यांवर चांगला मेकअप लावा जेणेकरून ते हाईलाइट होतील आणि तुम्ही साध्या सोबर लुकमध्येही सुंदर दिसाल. या दिवशी जास्त मेकअप करण्याची गरज नाही.
हेयरस्टाइल:
पूजेच्या वेळी, एकतर केस मोकळे ठेवा आणि आपल्या पसंतीचा पफ बनवा किंवा तुम्ही ते साइडला टक करू शकता. अशावेळी सिंपल लूक जास्त मस्त वाटेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here