घरातून काम केल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो

घरातून काम केल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो

कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करणे अनेकांना नवीन होते. घरीच बसून ऑफिसचं काम करताना एकीकडे घरातला आणि ऑफिसचा बॅलन्स सांभाळावा लागत होता. परत एकीकडे काम सुरू असताना अबरचबर खाणंही चालू असायचं. या काळात अनेकांचं वजन वाढलं. त्यामुळे वजन कमी कसं करायचं. हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अनेकांना अपचनाचा त्रास सहन करावा लागत आहे. आता जरी रुटीन सुरू झालं असलं तरी काही कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय जास्त चांगला वाटतोय. पण मग वाढलेल्या वजनाचं काय, ते कमी करणं गरजेचं आहे. म्हणूनच आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकरने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत वजन कमी करण्यासाठी काय काळजी घ्यायची ते सांगितलं आहे. यासाठी त्यांनी तीन पदार्थांचा आहारात समावेश करण्यासाठी सांगितले आहे. हे तीन पदार्थ आहारात घेतल्यावर अपचनाच्या समस्या दूर होतीलच, शिवाय अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल.

ताजी फळे खा

ताजी फळे खा

हेही वाचा: वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

O तीन उपाय करावेत

1) ताजी फळे दररोज खा

आरोग्याच्या दृष्टीने नियमित ताजी फळे खाणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी दिवेकर म्हणतात की, तुमच्या घराजवळ असलेल्या बाजारात जी ताजी, हंगामी फळे सहज मिळतात तीच घ्यावीत. चिकु खाल्ल्याने पचनसंस्थेच्या तक्रारी कमी होतात. त्यामुळे चिकू खाण्याचा सल्ला दिवेकर यांनी दिला आहे. ताज्या फळांमुळे शरीराला फायबर मिळते. त्यामुळे पचन कार्य सुधारते. तसेच ताज्या फळांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

गुळ आणि वायफळ बडबड आरोग्यासाठी फायदेशीर आहे पूर्ण कथा वाचा

गुळ आणि वायफळ बडबड आरोग्यासाठी फायदेशीर आहे पूर्ण कथा वाचा

फुटाणे आणि गुळ खा

वर्क फ्रॉम होम करताना बराच वेळ एकाच जागी बसल्याने अनेकांच्या कंबर, मांड्यांवरील जाडी वाढली आहे. जास्त वेळ बसल्याने कंबरेखालच्या भागातील बोन मिनरल डेन्सिटी कमी होत जाते. याचा अधिक त्रास महिलांना होतो. त्यांचे मासिक पाळीचे चक्र बिघडते. ब्लीडिंग खूप होते. या आणि अशा त्रासापासून वाचण्यासाठी फुटाणे खाण्याचा सल्ला दिवेकर यांनी दिला आहे. गुळाबरोबर फुटाणे खाल्ले की गोड खाण्याचे समाधान मिळेल. कारण या काळात अनेकांचे गोड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. फुटाणे खाल्याने अमिनो अॅसिड, फायबर मिळेलच. शिवाय गुळ खाल्ल्याने व्हिटामिन बी योग्य प्रमाणात मिळून मनावरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा: भारतीय लपवितात डोकेदुखी! ६० टक्के नागरिक त्रस्त

तूप

तूप

साजूक तूपाचा समावेश आवश्यक

या काळात अबरचबर खाणे जास्त होते. त्यामुळे पोट भरलय का नाही ते समजतच नाही. सतत खायची इच्छा होऊ शकते. कुठे थांबावं तेच कळत नाही. अशावेळी सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीच्या जेवणात एक टीस्पून साजूक तुप घ्या. यामुळे पचनाच्या समस्या दूर होऊन भुक लागल्याची जाणीव होण्यास मदत होईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here