साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देवून घटस्थापना झाली आणि नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात दर्शनासाठी अशा पद्धतीची सुविधा केली आहे.
भाविकांनी सकाळपासून मंदिर परिसरात हजेरी लावली आहे
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंदिरातही ठिकठिकणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
सोशल डिसटन्सचे पालन व्हावे यासाठी ठिकठिकाणी पोलिस, जवान तैनात केले आहेत.
दर्शन घेतल्यानंतर अनेकांना सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. युवक युवतींसह अनेकांनी फोटो क्लीक केले.
याठिकाणी एक मेडिकल कॅंपचे नियोजन केले आहे.
पोलिसांनी ठिकठिकाणी तैनात केल्याने शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन सुरु होते.
तुळजाभवानी मंदिर परिसर भाविकांनी गजबजसा होता. तेथेही तुरळक गर्दी दिसून आली.
देवीच्या दर्शनानंतर प्रसाद घेण्यासाठी मंदिराबाहेर असे स्टॉल उभे होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here