नागपूर : झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने चार गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम अशा या गुळामध्ये बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे. शरीरासाठी लाभदायी आहे. आयुर्वेदानुसार दररोज उपाशापोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्तता होते. सकाळी उठल्याबरोबर उपाशापोटी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होते, चयापचय क्रिया चांगली राहते.
एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो. ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून हे करावे. गॅसचा त्रास असणाऱ्यांनी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर गूळ खावा.
दिवसभर थकवा जाणवत असेल तर सकाळी उपाशापोटी गूळ नक्की खा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शुगरही नियंत्रणात राहते.
खानपानाच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. अशा वेळी दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
अन्न पचन सहज होत नाही अशा व्यक्तींनी गूळ आणि गरम पाणी नक्कीच पिले पाहिजे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here